नांदेड (प्रतिनिधी)-गुरुजी चौक, पावडेवाडी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घरातून तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती मिळत आहे. पूजा विकास मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील १ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ३५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख पुढील तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 636 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या काँग्रेसचे कंट्रोलर कोण? महिला नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांना तुरुंगात राहणार