नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोलंबी ता.नायगाव येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 46 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सरस्वतीनगर कॅनॉल रोड येथून एक चार चाकी गाडी चोरीला गेली आहे. रेल्वे स्टेशन समोरून दीड लाख रुपये किंमतीचा एक ऍटो चोरीला गेला आहे आणि भाजी मंडई इतवारा येथून एक 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे.
रेणुकाबाई शिवाजी टोकलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान मौजे कोलंबी ता.नायगाव येथील त्यांचे घर बंद पाहुन कोणी तरी च ोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि आतील पत्र्याच्या पेटीचे कुलूप तोडून त्यातील 1 लाख 46 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा 234/2025 प्रमाणे दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पोमनाळकर अधिक तपास करीत आहेत.
शिवचरण दत्तराम पाटील यांनी दि.21 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता आपली चार चाकी गाडी क्रमंाक एम.एच.26 बी.सी.9933 सरस्वतीनगर कॅनॉल रोड येथे उभी केली होती. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत ती गाडी कोणी तरी चोरून नेली होती. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 619/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार माळवे अधिक तपास करीत आहेत.
दि.17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता नांदेड रेल्वे स्थानकाच्या गेटसमोर उभा असलेला 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचा ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.5809 हा कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार ऍटो मालक महेंद्र हटकर यांनी दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 478/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार हबीब चाऊस अधिक तपस करीत आहेत.
दि.21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता भाजीमंडई इतवारा येथून दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.यु. 9313 किंमत 50 हजार रुपये कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार इंद्रपालसिंघ सुरेंद्रपालसिंघ संधु यांनी दिल्यानंतर इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 355/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वासरकर अधिक तपास करीत आहेत.
कोलंबीत घरफोडले; चार चाकी गाडी चोरी; तीन चाकी ऍटो चोरला; दुचाकी चोरी
