नांदेड- उमरी शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने आज रोजी उमरी शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत 9 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाखाली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, डॉ. पूजा भाकरे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड व एमजीवीएसचे मंगेश गायकवाड तसेच उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन आरमाळ, महिला पोलीस कॉन्सटेबल आम्रपाली कांबळे व जयश्री शेळके उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.
More Related Articles
लोहा येथे 29 मार्च रोजी राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
लोहा (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व प्रवेश…
उस्माननगरचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक
नांदेड,(प्रतिनिधी)-प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत सेवा दिल्याबरोबर उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना बदलीवर सोडण्यात…
नायगाव तालुक्यातून दीड लाखांचे पशुधन चोरीला
नायगाव (प्रतिनिधी) -तालुक्यातील मौजे गडगा येथे अज्ञात चोरट्यांनी पशुधन चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.…
