नांदेड (प्रतिनिधी)- राजनगर येथील एसबीआय एटीएममध्ये 85 वर्षीय वृद्धाला कार्ड बदलण्याच्या पद्धतीने फसवून ₹60,000 रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
शंकर मरिबा सावंत (वय 85) हे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता राजनगर, नांदेड येथील एसबीआय एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढून ते मोजत असतानाच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला.त्याने वृद्धांना सांगितले की “तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होत आहे, तुम्ही लगेच मिनी स्टेटमेंट काढा.”वृद्धांनी मिनी स्टेटमेंट काढताना त्यांचा पिन क्रमांक आरोपीने पाहून घेतला. त्यानंतर त्याने सावंत यांचे खरे कार्ड चोरून त्यांच्या हातात दुसरे एटीएम कार्ड देऊन फसवले.वृद्ध घरी गेल्यानंतर त्यांच्या खात्यातून एकूण ₹60,000 रुपये काढून घेतल्याचे उघड झाले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा क्र. 613/2025 नोंदवला आहे.पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
