एसटी डेपो नांदेड आगाराचे यांत्रीक विजय डाखोरे पाटील यांची परभणी विभागात बदली

कामगार-कर्मचाऱ्यांकडून सत्कार निरोप
नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगारातील कार्यरत यांत्रीक श्री विजय एकनाथराव डाखोरे पाटील पळसगावकर यांची विनंती बदली परभणी विभागामध्ये झाल्यामुळे नुकताच त्यांचा दि.16 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यानंतर कार्यमुक्त झाल्यामुळे त्यांचा एसटी नांदेड आगारातील कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांच्यावतीने शुभेच्छारूपी सत्कार करून निरोप देण्यात आला.
यावेळी आगाराचे चार्जमन मा.श्री. संदीप बोधनकर व पाळी प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, गिफ्ट भेटवस्तु देवून ह्दय सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांनी या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक करून आपले विचार मांडले.
ते आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना म्हणाले की, यांत्रीक श्री विजय एकनाथराव डाखोरे पाटील पळसगावकर हे एसटी महामंडळात 2011 मध्ये रापम नांदेड विभागाच्या प्रवासी सेवेमध्ये रूजु होवून हदगाव डेपो एक वर्षे, विभागीय कार्यशाळा (वर्कशॉप) नांदेड येथे पाच वर्षे, हल्ली नांदेड आगारात 6 वर्षे असे एकुण 12 वर्षे एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये उत्कृष्ट काम करून मोठे योगदान देवून कर्तव्य बजावले आहे. असे प्रतिपादन केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, विजय एकनाथराव डाखोरे पाटील पळसगावकर हे एसटीच्या प्रवासी कर्तव्य सेवेबरोबरच या आधुनिक काळामध्ये आधुनिकरित्या आपल्या शेतीमध्ये फुल उत्पादन करून कृषीनिष्ठ कार्य करून फुल उत्पादन घेवून खुप मोठी शेतीमध्ये प्रगती केल्यामुळे मी त्यांना शेतकरी मेकॅनिक असे संबोधतो, असेही ते शेवटी आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून चार्जमन संदीप बोधनकर, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड,  गिरीष कुलकर्णी, गणेश शिंदे, प्रसाद गोंदगे, शेख आलीम, देविदास महाजन, गजानन जाधव, शेख बशीर, दिपक भंडारे, मंगेश झाडे, संदीप भरांडे, चंद्रकांत कल्याणकर, नागनाथ करेवाड, राजू घंटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी रामप आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!