नांदेड – सकल आदिवासी कोळी महादेव जमातींच्यावतीने दि.15 नोव्हेंबर 2025 रोजी बिरसा मुंडा चौक काबरा नगर नांदेड येथे क्रांतीसुर्य, आदिवासी समाज क्रांतीचे जनक, धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी पोलिस निरीक्षक मा.श्री.चंद्रकांत गुंगेवाड यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मन्नेरवारलू समाज संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय अन्नमवाड यांनी बिरसा मुंडा यांच्या जिवन चरित्र कार्यावर सखोल असे अभ्यासपूर्ण भाष्य करून प्रकाश टाकला. यावेळी मुख्याध्यापक माधव रेडेवाड यांचा सामाजिक उत्कृष्ट कार्याबद्दल मन्नेरवारलू समाज संघटनेच्यावतीने विधीज्ञ ॲड.सुधीर राऊतवाड यांनी शाल, पुष्पहार देवून ह्दय सत्कार केला. या जयंती अभिवादन कार्यक्रम सोहळ्याचे प्रास्ताविक एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले तर सुत्रसंचालन मुख्याध्यापक दादाराव कोठेवाड यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन मुख्याध्यापक माधव रेडेवाड यांनी मानले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून चंद्रकांत गुंगेवाड, दत्तात्रय अन्नमवाड, ॲड.सुधीर राऊतवाड, राजु पालेपवाड, सौ.सुरेखा मादसवाड (खानापूरकर), श्रीकांत खानापूरकर, मुख्याध्यापक माधव रेडेवाड, दादाराव कोठेवाड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, विठ्ठल बुच्चलवाड, गजेंद्र ताडोड, साईनाथ रामोड, शंकर मेंगावार, गंगाधर आंदेलवाड, सुरेश यदलोड, विनोद मेडेवाड, अडबलवार सर, हनमल्लू मूत्येपोड, भागवत कोलगणे, इंद्रवाड, किशन अडबलवार, राजू पालेपवाड, गंगाधरराव देशमुख, कमलकिशोर जेठेवाड, तुकाराम बोलेवाड, प्रभाकर कानकुडकेवाड, भास्कर आकूलवाड, बालाजी अंकमवार, विष्णू बहिरवाड, हनमंत मेकेवाड, महिपती डोंबुलवाड, राम जेठेवाड, तुकाराम बोईनवाड, दोंतुलवाड सर, निलेश गोविंदवार, राजेश्वर पालेपवार, हणमंत मृत्येपोड, माधव अडबलवार, विश्वांभर मद्देवाड, गणपत नागदरवाड, गंगाधर अनपलवार, सुरेश इरलवाड, विठ्ठलराव पंजेवार, देविदास सुरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या जयंती सोहळा कार्यक्रमास सकल आदिवासी कोळी महादेव व मन्नेरवारलू समाजाचे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी कोळी महादेव जमातींच्यावतीने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
