विशेष म्हणजे, ज्या महिलांनी सहभाग घेतला त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या कलेला प्रदर्शित करण्यासाठी प्रथमच असा मोठा मंच मिळाला, तसेच आपल्या अनुभवांविषयी बोलण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. समाजासमोर स्वतःची कला, कौशल्य आणि विचार मांडण्याचे सुख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. * कार्यक्रम यशस्वी बनविणाऱ्या नवयुवतीचे उल्लेखनीय योगदान. या संपूर्ण उपक्रमामध्ये नवयुवती हरमिदंर कौर गील यांची भूमिका विशेष अधोरेखित करावी लागेल.
कार्यक्रम सुरू करण्यामागील उद्देश, महिलांसाठी स्वतंत्र मंचाची गरज आणि समाजातील स्त्री-शक्तीची ओळख या सर्व बाबी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे व उत्कृष्ट पद्धतीने मांडल्या.शिख समाजातील महिलांच्या प्रगतीविषयी अशा परिपक्वतेने विचार मांडणारी युवती प्रथमच समाजाच्या नजरेस पडली—हे या कार्यक्रमाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य ठरले.
सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श
प्रत्येक स्टॉलधारक महिलेकडून केवळ 200 रुपये नाममात्र शुल्क घेण्यात आला. जमा झालेली संपूर्ण रक्कम कोणताही गाजावाजा न करता गरजू विद्यार्थ्यांच्या ट्युशन फी साठी तत्काळ अर्पण करण्यात आली—ही कृती उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
माता विद्या कौर यांचा मानाचा सत्कार
गेल्या 40–45 वर्षांपासून संचखड गुरुद्वाऱ्यात निस्वार्थ सेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या माता विद्या कौर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांचे सेवाव्रत समाजासाठी आदर्शवत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिला
चंचल कौर सोहल,मनदीप कौर भोसीवाले,राजेंदर कौर खैरा,श्रीजा यशवंतकर,अकालजीत कौर गाडीवाले, हरबंस कौर फिरंगे,
मनमीत कौर कामठेकर,हरबंस कौर तिवाना,सतप्रीत कौर कालो
या सर्व महिलांनी मनापासून मेहनत घेऊन कार्यक्रमाची प्रत्येक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे मोलाचे मार्गदर्शन
या सर्व महिलांना सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारे सामाजिक कार्यकर्ते स. रंजीत सिंघ जी गील यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम आयोजनात विशेष मोलाचा हातभार लावला.
* मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी
या कार्यक्रमाला हेड जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी,सहायक जत्थेदार भाई राम सिंघ जी,संत बाबा बलविंदर सिंघ जी तसेच अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
महिलांना प्रथमच असा सन्मानाचा आणि प्रगतीचा मंच उपलब्ध करून देत हा कार्यक्रम शिख समाजात एक नवीन आणि ऐतिहासिक पाऊल म्हणून नोंदला गेला.आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महिलांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे आणि भविष्यात अनेक महिलांसाठी मार्गदर्शक बनणार आहे.
– राजेंद्र सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड 7700063999
