आज दि. १७ नोव्हेंबर रोजी सादर होणारे नाटक रद्द झाले आहे
नांदेड (प्रतिनिधी)–महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेला रविवारी (ता.१६) सुरुवात झाली. नांदेड केंद्रावर ‘उद्रेक’ या नाटकापासून थाटात राज्य नाट्य स्पर्धेची सुरूवात झाली. पुढील १० दिवस नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवणी मिळणार आहे.
कुसुम सभागृहात रविवारी सायंकाळी सात वाजता राधिका वाळवेकर (जेष्ठ रंगकर्मी), गोविंद जोशी (जेष्ठ रंगकर्मी), परीक्षक अविनाश कोल्हे, ऍडव्होकेट प्रतिभा तेटू, प्रकाश खोत तसेच रंगकर्मी राहुल जोंधळे यांच्या उपस्थित स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर लेखक रविशंकर झिंगरे लिखित मधुकर उमरीकर दिग्दर्शित “उद्रेक’ हे परभणी येथील अष्टविनायक कला व क्रीडा आणि सेवा प्रतिष्ठान निर्मिती असलेल्या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी रसिक चांगलेच भारावून गेले होते.
आज दि. १७ नोव्हेंबर रोजी सादर होणारे ‘भयरात्र’ हे नाटक काही अपरिहार्य कारणामुळे रद्द झाले आहे. उद्या दी. १८ नोव्हेंबर रोजी विजय करभाजन लिखित आणि सुनीता करभाजन दिग्दर्शित ‘ते दिवस’ हे नाटक सादर होणार आहे तरी सर्व नाट्य रसिकांनी याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.
