नांदेड- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र सादर करावयाच्या कालावधीतील शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत.
याअनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत. या निवडणूक कार्यक्रमात रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाही असे नमूद आहे. त्यामुळे शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत का यासंदर्भात विचारणा होत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून वरीलप्रमाणे हे निर्देश प्राप्त झाले आहेत.
