वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा संवेदनशिल संवाद;सम्यक विद्यार्थी आंदोलनाला यश

धनगरवाडीचे शासकीय वस्तीगृह शहरात स्थलांतरीत होणार
नांदेड(प्रतिनिधी)-सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आपले शासकीय वस्तीगृह पुन्हा मुळ जागी पुर्नस्थापित करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी अत्यंत संवेदनशिलपणे बालकांचे सर्व ऐकून घेतले. जवळपास दोन तासांचा वेळ त्यांच्यासाठी दिला आणि त्वरीत प्रभावाने हे विद्यार्थी वस्तीगृह विद्यार्थ्यांसाठी सोयीच्या जागी प्रस्थापित करण्याच्या सुचना पण दिल्या. विद्यार्थ्यांनी या संदर्भाने वास्तव न्युज लाईव्हल सांगितले की, सोमवारपर्यंत आमच्या वस्तीगृहाची सोय झाली नाही तर आम्ही आंथरुण घेवून जिल्हाधिकारी कार्यालयातच मुक्काम करू.
नांदेड शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेले समाज कल्याण विभागाचे वस्तीगृह मौजे धनगरवाडी येथे आहे. हे वस्तीगृह काही महिन्यांपुर्वी शहरात महाविद्यालयांच्या जवळपास असलेल्या जागेत होते. आजच्या परिस्थितीत मुलांना 20 किलो मिटर जाणे आणि येणे करावे लागते. या वस्तीगृहात 10 ते 12 इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासकीय वस्तीगृहातील सर्वच विद्यार्थ्यांच्या तासिका सकाळी 7 ते 8 या वेळेत सुरू होतात आणि त्या दिवसभर सुरू राहतात. सकाळी येतांना न्याहारी सुध्दा करता येत नाही आणि दुपारचे जेवण 12 ते 1 वाजेदरम्यान मिळते त्यावेळेस जाता येत नाही.
हे वस्तीगृह राष्ट्रीय महामार्ग 361 च्या जवळ आहे. यावरून जड वाहणे अत्यंत वेगाने धावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवेताला सुध्दा तेथे अपघाताचा धोका आहे. हा वस्तीगृहाचा परिसर निर्मनुष्य असल्याने गुंड आणि चोरट्यांकडून सुध्दा धोका आहे. वाहनांची सोय नाही. त्यामुळे अव्वाच्या सवा भाडे द्यावे लागते. म्हणूनच विद्यार्थ्यांचे शहराबाहेर असलेले वस्तीगृह शहरात स्थलांतरीत करणे बालकांच्या हिताचे आहे. समाज कल्याण विभागातर्फ स्वाधार शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीसाठी शहरापासून 5 किलो मिटर अंतरात महाविद्यालय असले पाहिजे. तिच अट शासकीय गुणवंत वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी का नाही?
एकंदरीतच हे वस्तीगृह लवकरात लवकर शहरात स्थलांतरीत व्हावे. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या मासिक भत्यामध्ये वाढ व्हावी. शैक्षणिक संकुलापासून 2 किलो मिटर अंतरात विद्यार्थी वस्तीगृह असावे. या वस्तीगृहात शिकणाऱ्या 12 वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व निट परिक्षांसाठी योग्य व मोफत मार्गदर्शन व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. वस्तीगृह सुसज्ज आणि अभ्यासिका असलेले असावे असे निवेदन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनावर नांदेड जिल्हा उपाध्यक्ष अतिश ढगे, अभय सोनकांबळे, कुलदिप राक्षसमारे यांच्यासह विद्यार्थी स्वप्नील गच्चे, अतुल वाघमारे आणि संतोष इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या विद्यार्थ्यांनी या अगोदर समाज कल्याण विभाग, समाज कल्याण मंत्री यांना सुध्दा या संदर्भाची निवेदने दिली होती. परंतू काहीच प्रतिसाद आला नाही तेंव्हा या विद्यार्थ्यांनी काल दि.13 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला ा. परंतू त्यांची भेट झाली नाही. म्हणून विद्यार्थी जिल्हाधिकारी कक्षा बाहेरच अभ्यास करत बसले होते. परंतू आज जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांना भरपूर वेळ दिला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्याची उपाय योजना करण्यासाठी सुध्दा आदेश केले. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या संवेदनशिलतेने मुलांशी संवाद साधला तो संवाद प्रशंसनिय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!