अर्धापूर (प्रतिनिधी) — अर्धापूर पोलिसांनी आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पार्डी (म) शिवारातील टोल नाक्या जवळ कारवाई करत एका कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये म्हैस जातीची ५२ जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणात हरियाणा राज्यातील दोघे व उत्तर प्रदेशातील एक अशा तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंधरा लाख रुपये किंमतीची जनावरे आणि तीस लाख रुपये किंमतीचा कंटेनर, असा एकूण ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर भाऊराव सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस उपअधीक्षक डॅनियल बेन आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस अंमलदार गजानन शिंदे आणि माधव डुकरे यांनीही सहकार्य केले. तपासणीदरम्यान केए-०१ एएम-८५३६ क्रमांकाचा कंटेनर थांबवून पाहणी केली असता त्यात दाटीवाटीने जनावरे भरलेली आढळली. या प्रकरणी ईर्षात (वय ३०), हनी जान मोहम्मद (वय २५), दोघे हरियाणा येथील रहिवासी, आणि सोफियान जान मोहम्मद (वय २०) उत्तर प्रदेश येथील रहिवासी, या तिघांविरुद्ध गुन्हा क्र. ६५९/२०२५ दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास अर्धापूर पोलिसांकडून सुरू आहे. Post Views: 676 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation पीपल्स कॉलेज महिला संघाची विजयाची हॅट्रिक नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई — गोदावरी नदीपात्रातून वाळू उत्खननावर छापा, ₹४८.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त