नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -3

नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 01 ते 30 सप्टेंबर, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका – जुगार, अवैध दारु विक्री, शस्त्र अधिनियम व इतर कलमांन्वये अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -3 राबविण्यात येत आहे. सदर मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 07 सप्टेंबर, 2026 दरम्यान संपलेल्या पहिल्या आठवड्यात, नांदेड परिक्षेत्रात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (8), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (57), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (213), शस्त्र अधिनियमान्वये (10), तर इतर अधिनियमांखाली (53), अशा एकूण (341) कारवाया करुन (529) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 5,63,41,755/-  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परिक्षेत्रातील विविध घटकांनी या संदर्भात केलेली कारवाई पुढील प्रमाणे :

जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस
गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या
नांदेड 5 1375222 9 16 1574560 88 71 393155 73 2 0 3 19 36879705 29
परभणी 2 316331 2 8 1267990 35 20 128350 21 4 56000 5 8 2951750 11
हिंगोली 1 12002 1 14 4286755 56 64 232170 65 1 300 1 16 4216700 15
लातूर 0 0 0 19 682090 40 58 140460 59 3 0 5 10 1828215 11
एकुण 8 17,03,555 12 57 78,11,395 219 213 8,94,135 218 10 56,300 14 53 4,58,76,370 66

परिक्षेत्रात सुरू असलेली अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-3 ही पुढील आठवडयात आणखी व्यापकपणे राबविण्यात येणार आहे.

खबर  हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!