निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे इत्यादी बाबीस प्रतिबंध

   नांदेड- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी प्रतिबंध केला आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे.   फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुनेच लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
*शासकीय वाहनाच्या गैरवापरास प्रतिबंध*
 राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत तीनपैक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
कार्यालये, विश्रामगृहे इत्याुदी परिसरात मिरवणूका, घोषणा, उपोषण, सभा घेण्यावर निर्बंध
 राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालये, विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणूका घोषणा देणे, सभा घेणे इत्यादीवर निर्बंध घातले आहेत, याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे.  हा आदेश नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद,  किनवट, उमरी,  हदगांव,  मुखेड,  कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध
                                                                                                                                                                                                                                                                                              राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणा जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर प्रतिबंधीत केले आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत. हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!