नांदेड(प्रतिनिधी)-मनाठा पोलीसांनी मौजे रावणगाव शिवारातील निरंजन गोवर्धन राठोड यांच्या शेतात 7 जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून 2900 रुपये रोख रक्कम आणि एकूण साहित्य 2 लाख 95 हजार 900 रुपयांचे जप्त केले आहे.
मनाठा येथील पोलीस अंमलदार अतुल अशोकराव नागरगोजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 नोव्हेंबर रोजी मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रावणगाव शिवारात निरंजन गोवर्धन राठोड यांच्या शेतातील आखाड्यातील पत्राच्या शेडमध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकला. हा वेळे मध्यरात्री 12.30 वाजताचा आहे.
भोकरचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रच्य हाके यांच्या मार्गदर्शनात मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विलास चवळी, पोलीस अंमलदार कृष्णा यादव, रामराव राठोड, शामराव खनपट्टे आणि अतुल नागरगोजे यांनी ही कार्यवाही केली. त्या ठिकाणी पोलीस पथकाने मारोती जांबुवंतराव पोतरे (28), योगेश सुभाषराव मामीलवाड (25), निरंजन गोवर्धन राठोड(25) सर्व रा.रावणगाव, भागोजी गोविंद सावळे (28), विश्र्वंभर रामा लोणे(40) रा.शेंदण, रेषमाजी ग्यानोजी धुमाळे (35) रा.हाळेगाव आणि नामदेव कामाजी गायकवाड (38) रा.ठाकरवाडी ता.हदगाव यांना ताब्यात घेतले. या जुगाऱ्यांकडून 2900 रुपये रोख रक्कम 6 मोबाईल, पाच दुचाकी गाड्या आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 95 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनाठा पोलीसांनी या सात जुगाऱ्यांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 206/2025 दाखल केला आहे.
मनाठा पोलीसांनी सात जुगारी पकडले
