मुखेड (प्रतिनिधी) – मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका संतापजनक घटनेत वयाच्या २० ते २५ वर्षे वयोगटातील एका युवकाने सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6.45 ते 7 या वेळेत ही घटना घडली. पीडित बालिका शिकवण संपवून घरी परतत असताना ओंकार सतीश डाकुरवार या युवकाने तिला आपल्या घरासमोर थांबवून बांधकाम सुरू असलेल्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप आहे.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित बालिकेच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी, देगलूर यांनी आदेश दिल्यानंतर मुखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 65(2), 64(2) तसेच ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याच्या कलम 4 आणि 5(M) अंतर्गत गुन्हा क्रमांक 252/2025 दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास देगलूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण बेंबडे यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास जलदगतीने सुरू असल्याचे कळते.
