नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहयोग नगर भागात बंद घर फोडून चोरट्यांनी दोन लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
सह्ययोग नगर परिसरात राहणारे सुधीर लक्ष्मणराव भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या कालावधीत त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९३/२०२५ नोंदविण्यात आला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जहागीरदार पुढील तपास करीत आहेत.
