नांदेड(प्रतिनिधी)-बोळसा (बु) ता.उमरी येथून ट्रॅक्टरचे दोन हेड 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे चोरीला गेले आहेत. मेंढला (खु) ता.अर्धापूर येथून शेतात पेरलेले सोयाबीन 60 हजार रुपये किंमतीचे चोरण्यात आले आहे.
पंडीत गणपत वडजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरच्या रात्री मौजे बोळसा (बु) ता.उमरी येथे त्यंाच्या घरासमोर उभे असललेले ट्रॅक्टर हेड क्रमांक एम.एच.26 सी.पी.3661 आणि आनंदा आपुलवाड यांच्या मालकीचे ट्रक्टर हेड क्रमंाक एम.एच.26 बी.क्यु.2162 असा एकूण 4 लाख 80 हजारांचा ऐवज चोरट्यानंी चोरला आहे. उमरी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 337/2025 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
मौजे मेंढला ता.अर्धापूर येथील कविता बजरंग वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मेंढला येथील मुरली प्रकाश वानखेडे यांनी त्यांच्या शेतात पेरलेले सोयाबीन किंमत 60 हजार रुपयांचे चोरून नेले आहे. अर्धापूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 642/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार ढवळे अधिक तपास करीत आहेत.
उमरी तालुक्यात दोन ट्रॅक्टर हेड चोरले; मौजे मेंढला ता.अर्धापूर येथे पेरलेले सोयाबिन चोरले
