वडगाव खुर्द येथे दिवसा घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास

हिमायतनगर (प्रतिनिधी) — हिमायतनगर तालुक्यातील वडगाव खुर्द येथे चोरट्यांनी दिवसा घरफोडी करून सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

विलास तानाजी मिरासे (रा. वडगाव खुर्द) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास ते दुपारी चार वाजेपर्यंत घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम रुपये २०,००० असा एकूण सुमारे रुपये ७०,००० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९६ कलम ४५३, ३८० भा.दं.वि. नुसार नोंद करण्यात आली आहे.पोलिस अंमलदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!