जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द

    नांदेड – राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील 27 ऑक्टोबर 2025 च्या पत्रान्वये नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.

त्यानुसार अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी संबंधित तहसिल कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!