नांदेड(प्रतिनिधी)-माळोदेगल्ली हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच मौजे पार्डी ता.लोहा येथे चार जणांनी मिळून काही जणांना मारहाण करून त्यांच्या हातातील 90 हजार रुपयांची अंगठी बळजबरीने चोरली आहे.
विजय त्र्यंबकराव पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान माळवदेगल्ली येथील त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञान चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे आणि इतर साहित्य असा 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हदगाव पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 369/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक नंद अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पांडूरंग नारायण औंढे रा.पिंपळगाव येवला ता. लोहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता पार्डी शिवारात सार्वजिनक रस्त्यावर विनायक मटके, मल्लीकार्जुन मटके, मंगेश मटके आणि रुद्र मटके सर्व रा.पार्डी ता.लोहा यांनी संगणमत करून त्यांना आणि साक्षीदारांना व्यापाराच्या कारणावरुन धक्काबुक्की करून त्यांच्या हातातील बोटामध्ये असलेली 90 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने चोरून नेली आहे. या प्रकरणी लोहा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 331/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक पांचाळ यांच्याकडे दिला आहे.
हदगावमध्ये चोरी; पार्डी ता.लोहा येथे जबरी चोरी
