वृक्षलागवड करून कुलगुरूंचा वाढदिवस साजरा

नांदेड– महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती श्री. आचार्य देवव्रत यांनी मंगळवारी (ता. २८ ऑक्टोबर) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी आभासी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येकाने आपला किंवा संस्थेतील कुणाचाही वाढदिवस साजरा करताना एक तरी वृक्ष लावावा आणि त्याची जोपासना करावी, असे मार्गदर्शन केले होते.

 

राज्यपाल महोदयांच्या या प्रेरणादायी आवाहनाची अंमलबजावणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे करण्यात आली. कुलगुरू प्रा. डॉ. मनोहर चासकर यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठ परिसरात ५९ वृक्षांची सामूहिक लागवड करून अधिकारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला.

 

या वेळी विद्यापीठाचे प्र-कुलसचिव तथा अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे, प्र-वित्त व लेखाधिकारी डॉ. पराग भालचंद्र, इनोव्हेशन संचालक डॉ. शैलेश वाढेर, आय क्यू ए सी संचालक डॉ. सुरेंद्र रेड्डी, ग्रंथपाल डॉ. जगदीश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारुती गायकवाड, अधिसभा सदस्य डॉ. बाबासाहेब सुरवसे, डॉ अशोक कुंभारखाने, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, उपकुलसचिव व्यंकटराव रामतीर्थे, सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्देवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, उपअभियंता अरुण धाकडे, शकील अहमद, प्रीतम भराडिया यांच्यासह अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे विद्यापीठाने पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला असून राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनाचा आदर्श अंमल दाखविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!