कोणत्याही महिन्याची 29 तारीख आम्हाला साहेबाच्या वाढदिवसाची आठवण करून देते

साहेब, तुम्हीच आमचे तारणहार, पालनहार, ऊध्दारकर्ते, विकास पुरूष,आमचे भाग्यविधाते,अशी अनेक उपाध्या आहेत, तुमचे नुसते नाव घेतले तरी आम्हाला वाटते ,आम्ही सकटमुक्त झालो….

पण साहेब,,ऊस्मानशाही मिल बंद झाली आणि शेकडो कुटूंब देशोधडीला लागली,,साहेब,,निजाम काळात सुरू झालेले शेतकऱ्याच्या हिताचे कापूस संशोधन केंद्र आज मोडकळीस आलेले पाहून खूप वाईट वाटत आहे …नादेडचा सास्क्र्रतिक वारसा जपणारे,कलेला, सन्गिताला प्रेरणा देणारे कलामन्दीर आज उरले नाही,,

साहेब,,नादेड च्या दिग्गज लोकानी जेथे प्राथमिक शिक्षण घेतले ते मल्टीपर्पज हायस्कूल अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे ….

हे असे का झाले…

तुमचा दोष नाही….

साहेब,,ज्या मान्यवरांनी नादेडकराना. राजकारणातून समाजसेवेची प्रेरणा दिली ते अनंतराव नागपूर कर, जनाब फारूखपाशा,मागासवर्गीय पहिले खासदार हरिहरराव सोनुने, स्वर्गीय शंकरराव चव्हाण याना साथ देणारे शामराव बोधनकर ही नावे पुढील पिढीला समजणारही नाहीत म्हणून यान्चे पुतळे उभारावे,रस्त्याना ,महत्त्वपूर्ण ईमारतीना त्यान्ची नावे द्यावेत असे आम्हास वाटते…

साहेब,,त्यात आपला काय दोष…

अवयवदान या पवित्र विचारांसाठी आपण समर्थन द्यावे म्हणून आपल्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या परतु आपण लक्ष दिले नाही ..आपले चेले आपल्या दरबारात आमच्या सारख्या पामराला दाद देत नाहीत त्यात तुमचा काय दोष….त्याना वाटते जीवतपणी आमचे अवयवदान काढून घेण्यात येतील…हा भ्रम आहे ,साहेब तुमचा काय दोष…

साहेब,,तुम्हाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला तेव्हा आम्ही कासावीस होतो,वाटले आपल्या पावनकर्त्यावर हे सन्कट येवू नये…आम्ही मनापासून दुखी होतो,सर्व मिळून आत्महत्या करावी असे वाटत होते परतु दैव पावला,

नाहीतर देवाभावू पावला आणि तुम्हाला वनवास मुक्त केले तेव्हाच आम्हाला शान्त झोप लागली….

साहेब,,आता सारे रान मोकळे झाले…आपले रात्रंदिवस गुणगान गाण्यासाठी वाजंत्री नेहमीच तयार असतात…कोणाच्या हाती टाळ तर कोणाच्या हाती तबला पेटी,तर कोणाच्या हाती ढोलताशा, कोणाच्या हाती विणा,तर कोणाच्या हाती तम्बोरा…..

आपले जिवश्च कन्ठश्च अमरनाथ या वाजंत्री ना वाजवा असे सांगून गजर करतात फार बरे वाटते ….

रोज आपण काय करता यावर काही पोसलेले भाट बारीक नजर ठेवून आपल्याच पेपरात बातम्या छापून तुमच गोड कौतुक करतात आम्हास फार छान वाटतेय…

आता तर या भाटानी लाज शरम विकली असे वाटते . एकदोन वगळता बाकि चाटूगिरी करून पोट भरतात, त्याना समाजाचे कवडिचे देणेघेणे उरले नाही…

साहेब, आता तर प्रत्येक गल्लीत दादा लोक निर्माण झालेत,गुन्हेगार,,बलात्कारी,भ्रष्टाचारी,सामान्य लोकांवर अन्याय करीत तुमचेच नाव सान्गतात,,आम्ही साहेबाचे आहोत,,खबरदार…

साहेब, हे कलियुग आहे त्यात तुमचा काय दोष…रोज बापट बदलणारे,स्वार्थासाठी नवरे बदलणाऱ्या आपल्याच दरबारात सतत गर्दी करतात म्हणून आमच्या सारख्या खानदानी भिकार्‍यांना काहीच मिळत नाही…त्यात तुमचा काय दोष…

खर सान्गु साहेब,,शहरातील प्रत्येक रस्त्यावरील तुमचे फोटो पाहून आम्हास प्रभुरामचद्राचीच आठवण येते .प्रभु रामचंद्राना 14 वर्ष वनवास भोगावा लागला. तुम्ही रामचंद्रांचेच रूप वाटता….एक वचनी ,सत्य वचनी ….

साहेब,,शेवटी तुम्हाला 100 वर्ष जगण्याचे बळ मिळो हीच देवाजवळ पार्थना करतो

शहरातील रस्ते ,पाणी,अरोग्य आणि सार्वजनिक हिताचे कोणतेही भरीव काम नाही त्यात तुमचा काय दोष….तुमचेh विरोधक सतत बोलतात तिकडे लक्ष देवू नका आम्ही आपले भिकारचोट गुलाम तुमच्या पाठिशी आहोतच…..आम्ही या दलालाकडे लक्ष न देता तुम्हालाच शेवटपर्यंत समर्थन देवू….आपणास पुन्हा वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा….

लेखक – माधव अटकोरे, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!