भोकर(प्रतिनिधी)-शहरातील शिवाजी चौक भागात दोन घटना अर्ध्या तासाच्या अंतरात घडल्या आणि त्या संदर्भाने दोन दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्यातील फिर्यादी दुसऱ्या गुन्ह्यात आरेापी आहे. या उलट दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी आहे.
मोहम्मद रमीज अख्तर अब्दुल रफीक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे शिवाजी चौक भागात भारत मेडिकल स्टोअर आहे. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता विश्र्वास मारोती शामनवाड, साईनाथ शेंडगे, आणि इतर चार असे सहा जणांनी मेडिकल समोर मोटारसायकल उभी करण्याच्या कारणावरून गैरकाद्याची मंडळी जमवून भारत मेडिकलमध्ये घुसून त्यांना मारहाण करून सामानाचे नुकसान केले, त्यांच्या खिशातील मोबाईल आणि गल्यातील रोख रक्कम 3 हजार रुपये काढून घेत. जिवे मारण्याची धमकी दिली. यानुसार गुन्हा क्रमांक 508/2025 दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक आवटे अधिक तपास करीत आहेत.
याच ठिकाणी अर्धा तास अगोदर यावेळेत दिलेल्या तक्रारीनुसार विश्र्वास मारेाती शामनवाड यांनी तक्रार दिली आहे की, रमीज अख्तर, मुखीद शकील आणि इतर सहा जणांनी विश्र्वास शामनवाड व त्यांच्यासोबतचे साक्षीदार स्कुटीवरून जात असतांना त्यांना अडवले आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्या खिशातील चार हजार रुपये रोख रक्कम बळजबीरने काढून घेत जिवे मारण्याची धमकी दिली. भोकर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 510/2025 दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव हे करीत आहेत.
या दोन दरोड्यांच्या प्रकरणामध्ये सायंकाळी 7 वाजता दाखल झालेल्या गुन्ह्याचा क्रमांक 510 आहे आणि सायंकाळी 7.30 वाजता दाखल झालेल्या गुन्ह्याचा क्रमांक 508 आहे.
परस्पर विरोधी दरोड्याचे दोन गुन्हे भोकर शहरात दाखल
