नांदेड(प्रतिनिधी)-मौजे माळाकोळी ता.लोहा येथे दोन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 79 हजारांचा मुद्देमाल चोरला आहे. माळाकोळी येथे दोन घरात चोरी झाली असून एका घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे.
राहुल बळीराम कांबळे रा.माळाकोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ते पहाटे 6 वाजेदरम्यान ते सासुरवाडीकडे गेले असतांना त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असा 1 लाख 99 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच रमेश तुळशीराम राठोड यांचे घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम चोरली आहे. सोबतच अविनाश चव्हाण यांच्या घरात चोरीचा प्रयत्न सुध्दा झाला आहे. या सर्व तिन घटनांचा एक गुन्हा क्रमांक 190/2025 माळाकोळी पोलीसांनी दाखल केला असून या तिन घटनांमध्ये एकूण 3 लाख 79 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कोकाटे हे करीत आहेत.
