नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया अशा चार जिल्ह्यांना वगळून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या पत्रावर राज्य निवडणुक आयोगाचे उपसचिव के.सुर्यकृष्णमुर्ती यांची स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा व गोंदिया वगळून 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुकातील मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम तसेच 32 जिल्हा परिषदांच्या अंतर्गत 336 पंचाय समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 27 ऑक्टोबर 2025 रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुढील कार्यक्रमानुसार निवडणुक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या आता 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत पुर्ण करायच्या आहेत. निवडणुक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याची अधिसुचना प्रसिध्द करण्याची तारीख 3 नोव्हेंबर 2025 आहे. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी 3 नोव्हेंबर 2025 ही तारीख सुनिश्चित करण्यात आली आहे.
सोबतच राज्य निवडणुक आयोगाकडून मतदार यादीतील दुबार नावांबद्दल करावयाची कार्यवाहीबद्दल सुचना वेगळी निर्गमित करण्यात येणार आहे. त्यानुसार दुबार नावांबाबत आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करायची आहे.
32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती निवडणुक यादी कार्यक्रम
