नांदेड(प्रतिनिधी)-25 आणि 26 ऑक्टोबरला पाऊस पडला होता. यातच एक 74 वर्षीय व्यक्ती आपल्या शेतातील विहिरीतून पाणी सुरू करून पांदन रस्त्याने जात असतांना त्यांच्या शेतातील विद्युत खांबाला काही तरी कारणानी स्पर्श झाला आणि विद्युत झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
शेषाबाई मारोती घंटेवाड यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचे पती मारोती मष्णाजी घंटेवाड (74) आपल्या शेतातील विहिरीच्या मोटारचे बटन सुरू करून पांदन रस्त्याने पाणी सोडण्यासाठी जात असतांना शेतातील विद्युत खांबाचा विद्युत झटका लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. मरखेल पोलीसांनी या प्रकरणी या प्रकरीण आकस्मात मृत्यू क्रमांक 2013/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार हिंगोले अधिक तपास करीत आहेत.
विद्युत पोलचा झटका लागू 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
