नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑक्टोबर रोजी हदगाव उमरखेड रस्त्यावर घडलेल्या अपघात प्रकरणी अभयसिंह रोड प्राधिकरणचे अधिकारी, जेसेबी चालक आणि सुपरवायझरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि पाच जण जखमी झाले होते.
रामराव शंकरराव देगुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास हदगाव उमरखेड रस्त्यावर मानेगाव पाटीजवळ अपघात घडला होता. ज्यामध्ये कार क्रमांक एम.एच.04 जी.जे. 3707 मध्ये बसून मनोज रामराव देगुरे (30) मंजुषा देविदास अहिलवार(37), मनिषा निळकंठ रासेवार (40) सर्व रा.लातूर हे हदगाव ते चंद्रपुरकडे जात असतांना हा अपघात घडला. या अपघाताचे कारण म्हणजे जेसीबी मशिन क्रमांक एम.एच.29 बी.व्ही. 2719 ही चुकीच्या पध्दतीने उभी करण्यात आली होती. या जेसीबीचा चालक लहु मिरसे आहे. तसेच हे जेसीबी अभयसिंह रोड प्राधिकरणाचे आहे. म्हणून त्याचे अधिकारी आणि धावर कंपनीचा सुपरवाझर या अपघातासाठी जबाबदार आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि पाच जण जखमी झाले होते. हदगाव पोलीसांनी या संदर्भाचा गुन्हा क्रमांक 364/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक बरगे अधिक तपास करीत आहेत.
अपघातातील मृत्यू आणि जखमीसाठी अभयसिंह रोड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
