नांदेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या नांदेड जिल्हा शहर अध्यक्षपदी ॲड. अनुप श्रीराम आगाशे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप गंगातीर यांनी केली असून, ही निवड संघटनेचे अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली साहेब यांच्या संमतीने करण्यात आली आहे.
याचबरोबर, ॲड. संतोष जोंधळे यांची जिल्हा शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने निवड झालेल्या जिल्हा शहर अध्यक्ष ॲड. अनुप आगाशे हे लवकरच संपूर्ण शहर कार्यकारिणीची स्थापना करणार असून, सर्व नोटरी वकील बांधवांच्या हक्क व हितासाठी प्रभावीपणे कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हा स्तरावर कार्यकारिणीचीही लवकरच बांधणी होणार असून, सर्व नियुक्तीपत्रे महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत. या निवडीबद्दल सर्व स्तरातून ॲड. अनुप आगाशे व ॲड. संतोष जोंधळे यांचे अभिनंदन होत आहे.
