नांदेड(प्रतिनिधी)-हिंद-की-चादर श्री गुरु तेगबहाद्दुरसाहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या कार्यशाळेसाठी गुरुद्वारा सदस्यांची नावे मागवली असतांना नांदेडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन संत आणि 13 गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी अशी 15 नावे पाठविले आहेत. आता गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी तेथे काय बोलतील आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काय करतील असा प्रश्न नांदेड येथील नागरीक राजेंद्रसिंघ शाहु यांनी उपस्थित केला आहे. शाहु यांच्या मते एकीकडे इयत्ता नववी वर्षाच्या ईतिहास पुस्तकात जर्नेलसिंघ भिंद्रानवाले हे अतिरेकी असल्याचे शिकवले जात आहे आणि त्यांनी स्थापन केलेल्या दमदमी टकसालचे आजचे संत हरनामसिंघ खालसा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंद-की-चादर या कार्यक्रमासाठी फोटो काढतात हा दुप्पटीपणा आहे.
उद्या दि.25 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील स्वामी नारायण मंदिरात दादर(पु) येथे हिंद-की-चादर श्री गुरु तेगबहाद्दुरसाहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत एक कार्यशाळा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी अनुप कुडव यांनी 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी नांदेड, नागपूर आणि रायगड या तिघांना पत्र लिहिले. त्यात नांदेड-नागपूर आणि रायगड जिल्ह्यातील अनुभवी एक उपजिल्हाधिकारी पदाचा अधिकारी यांची एकलबिंदु समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे सांगितले आहे आणि त्या अधिकाऱ्याचे नाव आणि संपर्क पत्ता कळवा असे नमुद केले आहे. सोबतच गुरुद्वाराच्या प्रमुख सदस्यांना दुरध्वनीद्वारे आणि प्रत्यक्षरित्या सदर कार्यशाळेत उपस्थित राहण्याबाबत त्या समन्वय अधिकाऱ्याने कळवायचे आहे आणि गुरुद्वारा सदस्यांची माहिती प्रपत्रात भरून desk5.mdd-mh@nic.in आणि sakwanjagdish@gmail.com या ईमेलवर 23 ऑक्टोबर 2025 च्या संध्याकाळपर्यंत पाठवायची आहे.
नांदेडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये गुरुद्वारा लंगरसाहिब येथील संत बाबा बलविंदरसिंघजी आणि गुरुद्वारा माता साहिब देवाजी मुगट येथील संत बाबा तेजासिंघजी यांच्या नावासह गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी प्रशासक डॉ.विजय सतबिरसिंघ, सरदार हरजितसिंघ कडेवाले, सरदार जगमिरसिंघ कुलवंतसिंघ, सरदार सुखदेवसिंघ, सरदार फुलासिंघ रगबिरसिंघ, सरदार हरभजनसिंघ शेरसिंघ भोसीवाले, सरदार सुलिंदरसिंघ हरीसिंघ, सरदार सविंद्रसिंघ बलवंतसिंघ लाखवाले, सरदार बसंतसिंघ जितसिंघ, सरदार गुरदिपसिंघ पुरणसिंघ, सरदार महिपालसिंघ अमरसिंघ, सरदार जसबिरसिंघ हरीसिंघ शाहु, सरदार लखविंदरसिंघ जगतसिंघ दफेदार अशी 15 नावे आहेत. ज्यामध्ये दोन संत आणि इतर 13 म्हणजे ते गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी आहेत. या प्रपत्रामध्ये गुरुद्वारा सदस्यांची नावे पाठवायची होती. पण सध्या सदस्य नाहीत आणि 13 पैकी 12 गुरुद्वारे गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या अखत्यारीत संचलित होतात.
या संदर्भाने नांदेड येथील नागरीक सरदार राजेंद्रसिंघ शाहु सांगत होते की, गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारीच जात आहेत तर ते धार्मिक कार्यक्रमाबाबत काय बोलतील. त्यापेक्षा सिख समाजातील वरिष्ठ नागरीकांना आणि धार्मिक अभ्यास असणाऱ्यांना बोलवायला हवे होते असे सरदार शाहु सांगत होते. महाराष्ट्र शासनाच्या शालेय पुस्तकाप्रमाणे इयत्ता नववीच्या पुस्तकात प्रत्येक भाषेमध्ये दमदमी टकसालचे संस्थापक सरदार जर्नेलसिंघ भिंद्रालवाले यांना अतिरेकी असल्याचे शिक्षण बालकांना दिले जात आहे आणि आज त्या दमदमी टकसालच्या गादीवर विराजमान असलेले संत सरदार हरनामसिंघ खालसा यांच्यासोबत हिंद-की-चादर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छायाचित्रे काढत आहेत. हा सुध्दा दुप्पटी पणा असल्याचे मत सरदार राजेंद्रसिंघ शाहु यांनी व्यक्त केले.
शासनाच्या कार्यक्रमात गुरुद्वारा सदस्यांऐवजी 13 गुरुद्वारा कर्मचाऱ्यांची नावे-सरदार राजेंद्रसिंघ शाहु
