नांदेड –लोहमार्ग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गंगाधर पांचाळ यांची बदली भुसावळ येथे करण्यात आली आहे. एका बाजूला 14 लाखांच्या चोरीचा गुन्हा फोडणारा हा अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याविरोधात काही माध्यमांमधून ‘उचल बांगडी’ झाल्याची बातमी त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.हनुमंत पांचाळ यांनी आपल्या कार्यकाळातच आपल्या पोलीस ठाण्यातीलच एका पोलिस कर्मचाऱ्याला 14 लाखांच्या चोरीप्रकरणी रंगेहात पकडून थेट लॉकअपमध्ये डांबले. मात्र न्यायालयाने त्या आरोपी पोलिसाला कोठडी नाकारल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पांचाळ यांनी तत्काळ रिव्ह्यू याचिका दाखल केली असून 27 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

📰 पत्रकारीय घाई की सुपारी?
दरम्यान काही स्थानिक पत्रकाराने कोणतीही पार्श्वभूमी तपासता पांचाळ यांची बदली ‘उचल बांगडी’ म्हणून प्रसिद्ध केली. या बातमीमुळे फिर्यादी गणेश राठी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “चोर पकडणाऱ्यालाच संशयाच्या भोवऱ्यात ओढणं ही माध्यमांची जबाबदार वृत्ती नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
🕵️ चोरीचा सिनेमॅटिक थरार!
ही घटना 7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर–नागपूर गाडीत घडली. वर्धा येथील प्रवासी गणेश राठी यांचा तब्बल 14 लाख 1200 रुपयांचा माल चोरीस गेला. एफआयआर नांदेडला पोहोचण्यापूर्वीच हनुमंत पांचाळ यांनी आरोपी बाळू गणपत गव्हाणे याला अटक केली आणि अटक केल्या नंतर चोरीचा 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
या प्रकरणात आरोपी पोलिस कर्मचारी अक्षय पोरचुरे (ब.न.441) हा धम्म परिषदेच्या बंदोबस्तासाठी गेलेला दाखवला असला तरी तो प्रत्यक्षात पूर्णा रेल्वे स्टेशनवर चोरीच्या रात्री फिरताना सीसीटीव्हीत दिसला. त्याने चोरट्याला एसी डब्याचे दार उघडून दिल्याचा आरोप आहे. अटक होण्यापूर्वी तो आणि चोरटा दोघेही एकत्र दिसले होते.विशेष म्हणजे पोलीस अक्षय पोरचुरे हा गणवेशात होता.
⚖️ कोठडी न मिळाल्याने तपास अर्धवट!
न्यायालयाने आरोपी पोलिसाला कोठडी नाकारल्याने तपासात अडथळा निर्माण झाला. तरीही पांचाळ यांनी कायद्याच्या मार्गाने रिव्ह्यू दाखल केला असून पुढील सुनावणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. फिर्यादी अर्धवट आनंदी तर अर्धवट नाराज आहेत. कारण ऐवज जप्त झाला असला तरी तपास पूर्ण झालेला नाही.
🪄 पत्रकारीतेचा बाण नेमका कुठे?
एका प्रसिद्ध स्थानिक दैनिकाने हनुमंत पांचाळ यांच्या बदलीला ‘उचल बांगडी’ असा रंग दिला. मात्र या बातमीत आरोपी पोलिसावरील सीसीटीव्ही पुरावे, अटक व न्यायालयीन प्रक्रिया यांचा उल्लेखच नाही. यावरून ही बातमी कोणाच्या सांगण्यावरून प्रसिद्ध झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चर्चा अशीही की संबंधित पत्रकाराच्या माहितीगाराचे आरोपी पोलिसाशी संबंध असल्याची शक्यता तपासली जात आहे.
👮 कर्तृत्वामुळेच बदल — दोषामुळे नाही!
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी पांचाळ यांच्याशी चर्चा करूनच बदलीचा निर्णय घेतला. “तुम्हाला पुढे अडचणी निर्माण होतील, म्हणून बदली केली जात आहे,” असे त्यांनी सांगितले. ही बदली शिस्तीची कारवाई नसून प्रशासकीय निर्णय आहे.अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
✍️ सत्य हरवू देऊ नका!
हनुमंत पांचाळ यांनी दीड वर्षांच्या कार्यकाळात अनेक चोरट्यांना गजाआड केले, लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आणि पोलिसांमधील गैरव्यवहारालाही आळा घातला. अशा अधिकाऱ्याविरुद्ध *“उचल बांगडी”*सारखे शब्द वापरणे ही पत्रकारितेची अधोगती असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
🗞️ ही कथा फक्त एका अधिकाऱ्याची बदली नाही, तर गुन्हेगारीवर प्रहार करणाऱ्याला संशयाच्या भोवऱ्यात ओढणाऱ्या ‘पत्रकारीय हातां’ची आहे. सत्य, असत्य आणि राजकारणाच्या संगमावर ही कथा उभी आहे. ✨
