‘हरवलेली लेकरू परतले घरट्यात’ — इस्लापूर पोलिसांनी 17 महिन्यांनंतर पंजाबमधून अल्पवयीन मुलीचा शोधून आणले

इस्लापूर (प्रतिनिधी)- आई-वडिलांसोबत झालेल्या वादानंतर घर सोडून गेलेली सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी तब्बल 17 महिन्यांनंतर पंजाब राज्यातून सुखरूप शोधून इस्लापूर पोलिसांनी परत आणली आहे. हरवलेली लेकरू अखेर पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत परतल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले.

 

तक्रारीनुसार, 28 मे 2019 रोजी सकाळी अकराच्या सुमारास घरातील किरकोळ वादानंतर मुलगी घर सोडून निघून गेली होती. या प्रक्रमांक 47/2025 दाखल करण्यात आला होता.

 

या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे इस्लापूर पोलिसांच्या हाती होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कोमल कांगणे, तसेच पोलिस कर्मचारी गजानन नागरगोजे आणि ओमप्रकाश डीडेवार यांनी संयम, तपशिल व तांत्रिक कौशल्य वापरून शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान मिळालेल्या सूचनांच्या धाग्याने पोलिसांनी पंजाब राज्यातील गुरदासपूर जिल्ह्यातील बुल्ला गावात मुलीचा ठावठिकाणा लावला. विविध तांत्रिक साधनांचा अचूक वापर करत पोलिसांनी तब्बल 17 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर या मुलीला पंजाबमधून शोधून आणले. अखेर तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

या प्रकरणात पोलिस दलाने दाखवलेली चिकाटी, तांत्रिक हातोटी आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरत आहे. हरवलेली फुलझाड पुन्हा घराच्या अंगणात उमलल्याने परिसरातही समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!