नागरिकांना रोहित्रावर जाऊन सुरळीत करावा लागतो विद्युत पुरवठ
संतप्त नागरिकांनी रात्री विचारला महावितरण अधिकाऱ्याला जाब
नांदेड– शहरातील सांगवी भागातील रोहित्रावरून होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव सुरू असून, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी, नागरिकांना स्वतःच डीपीवर जाऊन वीजपुरवठा सुरळीत करावा लागत आहे. डीपीवर वारंवार वाहनांचे पार्किंग होत असल्याने नागरिकांना धोका पत्करून ही कामे करावी लागत आहेत. काल मध्यरात्री संतप्त नागरिकांनी तरोडा येथील महावितरण कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच, तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सांगवी भागातील डीपीवर सतत पार्किंग होत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
