नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीसांनी दोन टिपर 62 लाख रुपयांचे आणि त्यात भरलेली 50 हजार रुपये किंमतीचे अवैध वाळू असा मुद्देमाल जप्त करून अवैध वाळू संदर्भाचे दोन गुन्हे दाखल केले आहेत.
दि.15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री खेडकरवाडी रस्त्यावर माळाकोळी पोलीस गस्त करत असतांना त्यांनी टिपर क्रमांक एम.एच.26 बी.ई.9903 आणि टिपर क्रमांक एम.एच.26 सी.एच.2098 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी पाच ब्रास वाळू भरलेली होती. गौण खनिज कायद्यानुसार रात्रीच्या वेळेत वाळूची वाहतुक अवैधच आहे. तसेच वाळू संदर्भाचे कागदपत्र त्या टिपर चालकांकडे नव्हते. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक बालाजी चामवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनुक्रमे गुन्हा क्रमांक 183 आणि 184 दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी राजू शिवाजी राठोड(33) रा. घनानाईक तांडा उमरज ता.कंधार आणि बालाजी दासु पवार (40) रा.रमणा तांडा ता. लोहा या दोघांची नावे दोन गुन्ह्यात आरोपी या सदरात आहेत.
पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, माळाकोळी चे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश मुळीक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बालाजी चामवाड, पोलीस अंमलदार हनुमंत बोंबले, शरदचंद्र चावरे, देविदास भुसेवाड यांनी ही कार्यवाही केली.
माळाकोळी पोलीसांनी 62 लाखांचे अवैध वाळू वाहतुक करणारे टिप्पर पकडले
