नांदेड(प्रतिनिधी)-स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा लिंबगाव येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरी करतांना 2 जणांना पकडण्यात आले आहे.
बॅंकेचे व्यवस्थापक अभिषेक सुभाषमणी त्रिपाठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजेच्यासुमारास सुभाष माधवराव शिरसाट आणि अकबर नावाचे दोन व्यक्ती यांनी बॅंकेतील सीसीटीव्ही कॅमरे फोडले आणि 10 हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच चोरी करण्याचा प्रयत्न करतांना त्यांना पकडले आहे. लिंबगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 177/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार सातारे अधिक तपास करीत आहेत.
लिंबगाव एसबीआय शाखेत चोरीचा प्रयत्न
