नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धानोरा ता.धर्माबाद येथे 2 लाख 79 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
धानोरा(खु) येथील माधव पिराजी दानेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 ऑक्टोबरच्या रात्री 11.45 ते 14 ऑक्टोबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले 1 लाख 54 हजार रुपये किंमतीचे दागिणे आणि रोख रक्कम 1 लाख 25 हजार रुपये असा 2 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. धर्माबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 296/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक लोणीकर अधिक तपास करीत आहेत.
धानोरा येथे 2 लाख 80 हजारांची चोरी
