नांदेड–लिंबगाव स्थानक तसेच परभणी–मुदखेड–हिमायतनगर या सेक्शन दरम्यान मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी राबविण्यात आली.
ही विशेष मोहीम एन. सुब्बाराव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. मोहीम श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक व डॉ. जे. विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तसेच श्री ऋतेश, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या सूचनेनुसार पार पडली.
या मोहिमेत एकूण 15 तिकीट तपासणी कर्मचारी, 04 वाणिज्य विभाग कार्यालयीन कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा बळ (RPF) यांनी सहभाग घेतला. एकूण 14 गाड्यांमध्ये सखोल तपासणी करण्यात आली.
या तपासणी दरम्यान एकूण 366 विनातिकीट व अनियमित प्रवासाचे प्रकरणे आढळून आली. त्यामधून ₹1,76,315/- इतकी रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्यात आली.
या मोहिमेचा उद्देश विनातिकीट प्रवासाला आळा घालणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे, गुन्हेगारांमध्ये नैतिक भीती निर्माण करणे तसेच प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता.
रेल्वेची प्रवाशांना विनंती
नांदेड विभागातील सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, कृपया वैध व योग्य तिकिटासह प्रवास करावा व कोणत्याही अडचणी अथवा दंडात्मक कारवाईपासून दूर राहावे. . भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा सुरू राहतील, जेणेकरून प्रवासी सोय आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल.

