नांदेड(प्रतिनिधी)- अतिवृष्टी आणि पुर झाल्यानंतर वाळूसाठा भरपूर जमतो याचा फायदा वाळू माफियांना होत असतो. त्याचा फायदा वाळू माफीयांनी घ्यायला सुरूवात केली. परंतू नांदेड पेालीसांनी सुध्दा कंबर कसलेलीच आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये नांदेड ग्रामीण पोलीसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. असाच काहीसा प्रकार सोनखेड पोलीसांनी सुध्दा केला आहे.
नंादेड ग्रामीण पोलीसांनी दि.13 ऑक्टोबर रोजी तिन वेगवेगळे गुन्हे दाखल करून टेम्पो क्रमंाक एम.एच.04 एफ.जे.3115, टेम्पो क्रमांक एम.एच.14 ए.एस.5966 असे आठ लाख रुपयांचे दोन टेम्पो आणि त्यात भरलेली दहा हजार रुपयांची अवैध वाळू पकडली. तसेच पाण्यात तरंगणारे दहा तराफे 5 लाख रुपये किंमतीचे असा एकूण 13 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शेख समीर शेख कासीमली (31), अमोल गणेश जाधव (24) दोघे रा.नवीन हस्सापूर नांदेड आणि दोन अज्ञात आरोपींविरुध्द तिन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीसंानी ही कार्यवाही करतांना आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये गजानन संभाजी येवले, गणेश जीवनराव येवले, मोहन गोविंद येवले, गजानन येवले, मदन दत्तात्रय येवले, ज्ञानेश्र्वर येवले अशा 6 जणांची नावे आरोपी या सदरात आहेत. ही कार्यवाही गोदावरी नदीपात्रात लगत केली. त्यात एक ट्रक्टर एम.एच.26 सी.पी.7123 क्रमांकाचा 7 लाख रुपये किंमतीचा, दोन लाख रुपयांचे इंजिन आणि 4 लाख रुपयांचे 8 तराफे आणि 2 लाख 75 हजार रुपये किंमतीची साठवलेली वाळू असा 8 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या दोन कार्यवाही पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पेालीस अंमलदार शेख इब्राहिम, केंद्रे, डफडे, पवार, कल्याणकर, जमीर, शेख आसीफ आणि कांबळे यांनी केली.

पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 ऑक्टोबर रोजी रात्री कलंबर फाट्याजवळ त्यांनी टिपर क्रमंाक एम.एच.26 ए.यु.4627 ची तपासणी केली. त्यामध्ये 5 ब्रास अवैध वाळू भरलेली होती. 40 लाखांचा टिपर आणि 25 हजारांची वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश कैलास जाधव विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, पोलीस अंमलदार केशव मुंडकर, शंकर याबाजी, रमेश वाघमारे, दिगंबर कवाळे, विजय सुर्यवंशी यांनी केली.
