नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड बसस्थानकातआपली सोन्याच्या दागिण्यांची पर्स विसरुन दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसलेल्या महिलेची सोन्याच्या दागिण्यांची पर्स मुखेड पोलीसांनी शोधून काढली आहे. त्यामध्ये 1 लाख 55 हजार रुपयांचे दागिणे होते आणि ते संपुर्ण दागिणे परत सापडले आहेत.
दि.12 ऑक्टोबर रोजी सौ.मिना प्रकाश सुर्यवंशी या महिलेने मुखेडच्या पोलीस ठाण्यात सांगितले की, मौजे कुद्राळा ता.मुखेड येथे ते चुलत बहिणीच्या मुलाच्या लग्नास जाण्यासाठी मुखेड बस स्थानकात आल्या. त्या फोनवर बोलत असतांना बोलत-बोलतच गेल्या आणि कुद्राळा जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. पर्स येथेच राहिली. पुढे त्यांनी बसमधून उतरून बसस्थानक परिसरात पर्सचा शोध घेतला पण पर्स मिळाली नाही. त्यानंतर त्वरीत प्रभावाने मुखेडचे पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्र, पोलीस उपनिरिक्षक अभिजित तुतूरवाड, पोलीस अंमलदार गोंटे, गौड, भुले आदींनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असतांना मिना सुर्यवंशीची पर्स घेवून जाणारा माणुस दिसला. शोध घेवून त्या माणसाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पर्समधील सर्वचे सर्व दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. या कार्यवाहीसाठी देगलूरचे पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांनी मुखेड पोलीसांचे कौतुक केले आहे.
मुखेड बसस्थानकात गहाळ झालेली 1 लाख 55 हजार रुपये ऐवजाची बैग शोधली
