नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर शाखेने मिसिंग प्रकारातील 150 ऍन्ड्राईड फोन हस्तगत केले आहेत आणि मालकांना परत दिले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत 20 लाख 10 हजार रुपये आहे.
नांदेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर पोलीस ठाणे नांदेड यांच्या पथकाने वेगवेगळ्या मिसिंग मोबाईलचा शोध घेतला आणि अशा 150 मोबाईलला हस्तगत केले. या सर्व मोबाईलची किंमत 20 लाख 10 हजार रुपये आहे. नांदेड पोलीसांनी आज ते मोबाईल मालकांना परत दिले. त्यावेळी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांची उपस्थिती होती. शोध घेतलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीसांनी Nanded Police या Facebook Page व Twitter वर प्रसिध्द केली आहे. जनतेने या संदर्भाची माहिती घेवून आपले मोबाईल परत घेवून जावेत असे आवाहन केले आहे. पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, मोबाईल गहाळ झाले असतील तर CEIR पोर्टलवर गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती अपलोड करावी. ही कामगिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एम.बी. चव्हाण, पोलीस अंमलदार दिपक ओढणे, महेश बडगु, कांचन कसबे, शुभांगी जाधव, दाविद पिडगे, काशिनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, ज्ञानेश्र्वर यन्नावार, दिपक राठोड, साई शेंडगे यांनी केली.
20 लाखांचे 150 मोबाईल नांदेड सायबर पोलीसांनी शोधले
