नांदेड(प्रतिनिधी)-रास्ता रोकोची परवानगी दिली नसतांना रास्ता रोको केलाच आणि त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने फेसबुक अकाऊंटवर अर्धापूर पोलीसांबद्दल वाईट शब्द लिहुन त्यांना धमकी सुध्दा दिली. हे प्रकरण लोण (बु) ता.अर्धापूर येथील वकील रविकिरण रामराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होवून सध्या अर्धविराम लागला आहे.
ऍड. रविकिरण शिंदे यांनी 4 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे अर्धापूर येथे रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन दिले. हा रास्ता रोको कार्यक्रम शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अर्धापूर येथील तामसा कॉर्नरवर होणार होते. अर्धापूर पोलीसांनी ऍड. रविकिरण शिंदे यांना 5 ऑक्टोबर रोजी एक नोटीस दिली. त्यानुसार जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जमावबंदी आदेश लागू आहेत. म्हणून परवानगी देता येणार नाही. तरी पण 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.10 ते 12.10 या एका तासाच्या वेळेत परवानगी नसतांना नागपूर-तुळजापुर हा राष्ट्रीय महामार्ग आडवून मोठ्या प्रमाणात गैरसोय केली. यावेळी एक रुग्णवाहिका आली होती. तेंव्हा त्या रुग्णवाईकेला सुध्दा अडथळा निर्माण केला. या संदर्भाने ऍड. रविकिरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द पोलीस अंमलदार भिमराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 581/2025 दाखल झाला.
त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांना त्यांचे पोलीस अंमलदार आणि बाहेरील नागरीकांनी सांगितले की, ऍड. रविकिरण शिंदे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमुळे पोलीस खाते बदनाम होत आहे. याच पोस्टवर राम कदम औंढेकर यांनी हिसाब करू असा प्रतिसाद दिला. त्याला प्रतिसाद म्हणून ऍड. रविकिरण शिंदे यांनी लवकरच असे शब्द लिहिले. ऍड. रविकिरण शिंदे यांनी केलेले पोस्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली. पोलीसांच्या कामात व्यथ्य आणावा, पोलीस दलामध्ये अर्धापूर येथील नेमणुकीस असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल जनतेत अप्रितीची भावना निर्माण करण्यासाठी आणि जनतेत पोलीसांची प्रतिमा मल्लीन करण्यासाठी ही पोस्ट केली आहे. त्या संदर्भाने त्यांना 8 ऑक्टोबर रोजी नोटीस दिली आणि पुरावे मागितले. पण पुरावे त्यांनी दिले नाहीत. म्हणून माझी पोलीस अप्रितीची भावना चेतवणे अधिनियम 1922 चे कलम 3 आणि भारतीय न्याय संहितेचे कलम 224 आणि 356 प्रमाणे तक्रार असल्याचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी म्हटले आहे. या प्रकरणी ऍड. रविकिरण शिंदे यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 589/2025 दाखल केला आहे.
फेसबुक पोस्टवर पोलीसांविषयी लिहिणे अवघड आहे; ऍड. रविकिरण शिंदेविरुध्द गुन्हा दाखल
