नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी सप्टेंबर महिन्यात झालेली हळद चोरी घडकीस आणली असून तीन आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरलेली हळद आणि इतर असा 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बाळासाहेब विक्रम माने यांनी 8 ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार 29 सप्टेंबर 2025 रोजी रात्री एमआयडीसी वेअर हाऊसमधून हळदीचे 33 कट्टे, 1 लाख 50 हजार रुपयांचे चोरीला गेले होते. यासंदर्भाने नांदेड ग्रामीण पेालीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 958/2025 दाखल करण्यात आला होता. त्यात इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, विष्णु कल्याणकर, संतोष पवार, मारोती पचलिंग, गंगलवाड या गुन्हे शोध पथकातील पोलीसांनी अत्यंत शिताफीने हळद चोरी करणार्या बालाजी किशन गळापडे (42) रा.बाभुळगाव जि.नांदेड, विनोद मधुकर कांबळे(34) रा.बळीरामपुर आणि गजानन कचरु पवार(48) रा.मरडगा ता.हदगाव या तिघांना पकडले. त्यांच्याकडून हळदीचे कट्टे वाहून नेणारी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एच.0139 जप्त केली.
सप्टेंबरमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा 8 ऑक्टोबर रोजी दाखल आणि 11 ऑक्टोबर रोजी उघड; नांदेड ग्रामीण पोलीसांची प्रशंसनिय कामगिरी
