नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सिमावृत्ती भागात असलेल्या एका गावात कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासत एका अल्पवयीन बालिकेेवर अत्याचार केल्याप्रकरणी पद्मशाली समाजाच्यावतीने तहसील कार्यालय हदगावसमोर निर्दशने करून निवेदन दिले आहे.
नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सिमावृत्ती भागात असलेल्या एका गावात हिमायतनगर तालुक्यातील सरसम (बु) येथील शिक्षक संदेश गुंडेकर हे कोचिंग क्लासेस चालवितात. त्यांच्याकडे येणाऱ्या एका बालिकेवर त्यांनी प्रेमाचे तार ओढत तिला जाळ्यात फसवले आणि तिच्यासोबत अत्याचारही केला. त्यामुळे ती बालिका गर्भवती झाली. दुर्देवाने 22 सप्टेंबर 2025 रोजी त्या बालिकेचा मृत्यूपण झाला. आरोपी शिक्षक गुंडेवार आणि त्यांच्या भावांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिडीत युवतीच्या कुटूंबियांवर सुध्दा दबाव आणला. या प्रकरणी पोलीस ठाणे बिटरगाव ता. उमरखेड येथे गुन्हा दाखल झाला आणि आरोपी शिक्षकाला अटकही झाली. यानंतर पद्मशाली समाजामध्ये या प्रकरणाचा रोष पसरला. शिक्षक संदेश गुंडेकरचा भाऊ साईराज गुंडेकर आणि आशिष गुंंडेकर यांना सुध्दा त्या प्रकरणात आरोपी करावे असे निवेदन पद्मशाली समाजाच्यावतीने हदगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ही माहिती संजय राऊलवार आणि गजानन जिदेवार यांनी दिली.
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या भावांना सहआरोपी करण्याची मागणी
