ॲड. गणेश जांबकर यांच्यावतीने संध्याछाया वृद्धाश्रमात फळ,साडी व दस्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न

नांदेड– जिल्हा व सत्र न्यायालय येथील प्रसिद्ध ॲड.  गणेश प्रभाकरराव जांबकर यांच्या वकिली व्यवसायाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नांदेड येथील संध्याछाया वृद्धाश्रमात सपत्नीक व आई-वडील यांच्या समवेत फळ,साडी व दस्ती वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.आनंदाने साजरी झाली वकिलीची 20 वर्षपूर्ती ज्येष्ठ मार्गदर्शक विधीज्ञ ॲड. श्री. गणेश जांबकर यांनी त्यांच्या वकिली व्यवसायातील 20 वर्षांची यशस्वी वाटचाल गाठली असून, या आनंदाच्या प्रसंगी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत नांदेड शहरातील स्थानिक वृद्धाश्रमात सेवा उपक्रम राबविला. या उपक्रमात ते व्यक्तिगत उपस्थित राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांना फळ,साडी व पंचा वाटप केले.वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारा हा उपक्रम अतिशय आनंदी वातावरणात पार पडला. ॲड. जांबकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, “व्यवसायिक आयुष्याबरोबरच समाजसेवेची जाणीव ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या विशेष क्षणी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी भाग्याचे आहे.”कार्यक्रमाला वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन, कर्मचारी व रहिवासी यांची उपस्थिती लाभली. सामाजिक सेवेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला. विशेष म्हणजे ॲड.जांबकर हे वाढदिवस असो किंवा घरगुती असलेले छोटे कार्यक्रम वृद्धाश्रम,अनाथ आश्रम अशा ठिकाणीच सेवाभाव व सामाजिक बांधिलकी म्हणून साजरे करत असतात. याप्रसंगी उपस्थित मार्गदर्शक मित्र ओंकार देशपांडे ॲड.चंद्रकांत जहागीरदार,त्यांच्या कार्यालयाचे सहकारी ॲड. राम जाधव, ॲड. दत्तप्रसाद तेलेवाड,ॲड. साईनाथ जाधव, ॲड.वैभव रेडे, ॲड. निखिल कैवारे,ॲड. निखिल चौधरी, ॲड. नितीन देशमुख,ॲड. बजरंग शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!