नांदेड(प्रतिनिधी)-एका 73 वर्षीय इसमाला तुमच्या हातातील अंगठी सारखी अंगठी माझ्या भावाच्या लग्नात करायची आहे अशी बतावणी करून एका व्यक्तीने 65 हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या फसवणूक करून घेवून गेले आहेत.
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले नागनाथ गोपाळराव पेन्सनवार (73) हे जळकोट जि.लातूर येथील आहेत. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मौजे जांब येथील हजरत धाब्यासमोर तुमच्या अंगठीसारखी अंगठी माझ्या भावाच्या लग्नात करायची आहे असे सांगून त्यांच्या दुचाकीवर बसला. थोडे पुढे जाऊन त्यांच्या हातातील दोन अंगठ्या घेवून माझ्या भावास दाखवून येतो अशी खोटी बतावणी करून फसवणूक करून घेवून गेला आहे. या अंगठ्यांची किंमत 65 हजार रुपये आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना 230/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.
73 वर्षीय इसमाची फसवणूक करून 65 हजारांच्या दोन अंगठ्या नेल्या
