नांदेड – आद्यकवी श्री महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त मराठवाड्यातील सकल आदिवासी कोळी महादेव जमातींच्या विविध प्रश्नाच्या न्याय मागण्यासाठी आदिवासी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा मराठवाडा प्रमुख मा.श्री.व्यंकट मुदिराज यांच्या नेतृत्वाखाली दि.7 ऑक्टोबर 2025 रोजी पासून चालू असलेल्या जिल्हाधिकारी नांदेड कचेरीसमोरील बेमुदत उपोषणाच्या ठिकाणी आद्यकवी तथा रामायण या महान पवित्र अशा ग्रंथाचे रचनाकार श्री महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले नांदेड जिल्ह्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय खासदार मा.श्री.प्रा.रविंद्र पाटील चव्हाण व मनपाचे माजी नगरसेविका श्रीमती कमलाबाई मुदिराज यांच्या हस्ते श्री महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खासदार मा.श्री.प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांनी या उपोषणास काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहिर पाठिंबा दर्शवून या उपोषणातील मागण्या संदर्भाने केंद्र शासन दरबारी संसदेमध्ये हे प्रश्न प्रामुख्याने लावून धरणार, असे जाहिर आश्वासन त्यांनी यावेळी आदिसी कोळी समाज बांधवांना दिले. व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. डी.डी.वाघमारे यांनीही त्यांच्या पक्षाच्यावतीने उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देवून जाहिर पाठिंबा दिला आहे. या जयंती सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून काँग्रेसचे खासदार मा.श्री.प्रा.रविंद्र पाटील चव्हाण, आदिवासी कोळी समाजाचे मराठवाडा प्रमुख तथा ज्येष्ठ नेते व्यंकट मुदिराज, मनपाचे माजी नगरसेविका श्रीमती कमलाबाई मुदिराज, समाजाचे नेते सुरेश बोईने, मल्हारी मोरे, शंकर मुदिराज, पुंडलिक मोरे, प्रल्हाद उडदवाड, गुणवंत एच.मिसलवाड, प्रभाकर केंगल, सत्यरानायण खेळगे, सत्यनारायण मुदिराज, संतराम विभुते, पांडूरंग सुरवसे, नरबाजी मोरे, पत्रकार गंगाधर जुकूलवार, शंकर तमवाड, दिपक मुदिराज, भुजंग सोनेवाड, संतोष वडजे, रामाराव बचंटी, पंडीत मुदिराज, सुर्यकांत चौदंते, उमाजी चुनोडे, अनिल मुदिराज, मुरलीधर मोरे, सत्यनारायण मामीलवाड, सौ.शारदाबाई गोपीवाड, सौ.लक्ष्मीबाई मुदिराज यांची प्रमुख उपस्थिती होती. या बेमुदत उपोषणास जिल्हाभरातून आलेल्या सकल आदिवासी कोळी महादेव समाज बंधू-भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आद्यकवी श्री महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
