नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागच्या महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्हात हाहाकार माजवला नदी, नाले, घरात पाणी शिरले अनेक नदीकाठच्या अनेक गाव बाधित पुरग्रस्त झाले . आता पुर ओसरला आणि जलजन्य आजार, किटकजन्य आजार व साथरोग उदभवणाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ” डंक छोटा, डेंगीचा धोका ” ! पुर ओसरला डेंगी व मलेरिया होणार नाही असे काळजी घ्यावे असे आवाहन डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी जिल्हातील पूरग्रस्त गावातील नागरीकांना केले आहे. जिल्हात मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शन खाली आरोग्य विभाग पूरग्रस्त गावात आरोग्य शिबीर घेऊन उपाययोजना करत असले तरी आता प्रत्येक नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे. पुराचे पाणी ओसरला नंतर गावागावात खड्डे, ओढे आणि पाणथळ जागा तयार झाल्या या ठिकाणी सुरुवातीचे सात दिवस डास, आळ्याची पैदास झाली त्यामध्ये डासांची उत्पती होते. डासांची उत्पती स्थिर व साचलेल्या पाण्यात होते विशेषत: घराच्या आसपास साचलेले पाणी, फुलदाण्या बादल्या, टाक्या, जुने टायर, नारळाच्या करवंटे किंवा गटाराच्या झाकणावर साठलेले पाणी डासाच्या निर्मीतीसाठी पोषक आहे. सध्या अशीच स्थिती सर्वत्र आहे.
या आळ्यातुन डासांची पैदास झाली असून यातुन एडीस डास डेंग्यु पसरवण्यासाठी तयार झाले असतील एडीस डास दिवसा चावतो तर अनफिलिस डास मलेरिया पसरवतो हे डास सायंकाळी आणि रात्री चावतो. मादी डास एका वेळी १०० ते २०० अंडी घालते जी फक्त ७ ते १० दिवसांत प्रौढ डासामध्ये रुपांतरीत होतात म्हणुन पुर ओसरला ” डंक छोटा, डेंग्युचा धोका” असे प्रतिपादन डॉ. संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
किटकजन्य आजार व जलजन्य आजारचा धोका आहे वेळीच उपाययोजना झाले तर डेंगी व मलेरियाचे धोखा टाळता येईल.
कसा ओळखावा डेंगी-मलेरीया
-: डेंगीचे लक्षणे :-
उच्च ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यामाघे वेदना, पुरळ, अशक्तपणा.
-: मलेरियाचे लक्षणे :-
थंडी वाजुन ताप येणे, घाम येणे, स्नायु दुखी
-: चिकन गुनिया :- सांधेदुखी, पुरळ, थकवा,
किटकजन्ये आजार टाळण्यासाठी परीसरातील, घरातील साचलेले पाणी वाहते करणे, सर्व घरातील वापर करावयाचे टाकी, हौद, भांडे, राजन, माठ, धुवून, पुसुन कोरडे करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, मछरदानी, आईल रिपलेट काईल अगरबत्ती चा वापर करावा. ताप, अंगदुखी, पुरळ, अशक्तपणा जाणवल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंदात जावे. पाणी गाळून उकळून किंवा फिल्टर करूनच प्यावे. लहान मुले व गरोदर माता, स्तनदा माता, जेष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन डॉ संगिता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
जलस्त्रोतही अशुद्ध क्लोरीनेशनची प्रकिया
ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याच्या तलाव व नदीकाठच्या विहीरी, गावातील सार्वजनिक पाण्याचे स्तोत्र अशुद्ध झाले आहे जसे हातपंप, बोर, अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे बाधितपुरर्ग्रस्त गावात झाले असेल त्या ठिकाणी चागले प्रतिचे ३३% क्लोरीन असलेल्या बिल्चीग पावडरचा वापर करून तात्काळ सर्व सार्वजनिक स्तोत्र चे शुध्दीकरण करूनच पाण्याचा पुरवठा व वापर करावा जेणेकरून जलजन्य आजार होणार नाही खबरदारी घ्यावी व वरील कोणतेही लक्षणे दिसून आल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र मध्ये जाऊन वैद्यकीय अधिकारी याचा कडून तपासणी करून उपचार घ्यावे असे आवाहन डॉ संगिता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
