5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास एका महिलेनं भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून अपहरण केले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोनि महेश माळी, पोनि बालाजी महाजन, पोउनि विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, संकेत सौराते, सचिन सोनवणे, पोलिस अंमलदार गजानन किडे, विलास माळवे, चाबूके . लाटकर, पांचाळ, मुंडे आणि पठाण यांनी तात्काळ तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपहरण करणाऱ्या दोघांची ओळख पटवण्यात आली. पुढील तपासात दोघेही सैलाब नगर, खडकपुरा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाड टाकून त्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- मोहम्मद अमीर मोहम्मद अफसर (वय 21)
- मोहम्मद इस्माईल अब्दुल हमीद (वय 21)
(दोघे राहणार खुदबई नगर, देगलूर नाका)
आरोपींनी वापरलेली एमएस 26 सीक्यू 9841 क्रमांकाची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.भाग्यनगर पोलिसांनी वेळेवर आणि अत्यंत कार्यक्षमतेने केलेली ही कारवाई समाजाच्या दृष्टीने दिलासादायक असून, त्यांची ही कामगिरी प्रशंसनीय आहे
