नांदेड :–धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सूर्यमुद्रा फाऊंडेशन, नांदेडच्या वतीने अमृत क्लिनिक,मेन रोड, श्रावस्तीनगर, नांदेड येथे दिनांक ०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ अशा सात दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबिरात पुरुष, स्त्री आणि बालके ह्यांच्या विविध आजारांची मोफत आरोग्य तपासणी सुप्रसिद्ध चिकित्सक डॉ. विलास भद्रे हे दररोज संध्याकाळी ४:०० ते रात्री ९:०० ह्या वेळेत करणार आहेत.
ह्या शिबिराचा सर्व रुग्णांनी विशेषतः पूरग्रस्त कुटुंबातील रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन राजशेखर सोनसळे, प्राचार्य पद्माकर जोंधळे, मायाताई सोनकांबळे,तेजस्विनी भद्रे यांनी केले आहे.शिबिर यशस्वितेसाठी ॲड कुणाल गवळे, प्रतिभा सोने,दादाराव वाघमारे, हर्षवर्धन सोनकांबळे आदी प्रयत्न करीत आहेत.
