नांदेड- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रु-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नियमित विद्यार्थ्यांची अर्ज UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत भगवयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी सर्व शाखाचे पुनर्परिक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय. आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची अर्ज त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरावयाच्या तारखांना पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे.
शुल्क प्रकारात उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocatioanl Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI ( औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची अर्ज भरावयाच्या तारखा बुधवार 1 ऑक्टोबर ते
सोमवार 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्याल यांनी 8 सप्टेंबर 2025 ते उपरोक्त नमूद कालावधीत नियमित शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणा करावे. शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये “Draft” चा “Send to Board” व Payment Status मध्ये “Not Paid चा “Paid” असा बदल झाला आहे का याची खातरजमा करावी.
शुल्क जमा केलेली आरटीजीएस/एनईएफटीद्वारे पावती/चलनासह विद्यार्थ्याच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळाप्रमुख, प्राचार्य यांनी नोंद घ्यावी. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईलमध्ये कॉलेज, संस्था मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.
सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन मधून प्रिलिस्ट उपलब्ध करून दिलेला असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
बारावी परीक्षेची अर्ज ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्र UDISE + मधील PEN-ID वरुन भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. DISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी. आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी), व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्याची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्याची अर्ज प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पद्धतीने भगवयाची आहेत. ज्या विद्यार्थ्याचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
