हस्सापूर येथे चक्काजाम आंदोलन

नांदेड,(प्रतिनिधी)-धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचे मल्हार योद्धा दीपक बोराडे हे जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे.शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला. आज राजे खंडेराव होळकर चौक हस्सापूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमुख कार्यकर्ते नवनाथ काकडे, प्रदीप सरोदे, गजानन सरोदे, रंगनाथ सरोदे, विठ्ठल सरोदे, गोविंद काकडे, पांडुरंग काकडे, मारोती सरोदे, मारोती काकडे, चांदु सरोदे, मनोज काकडे, सागर सरोदे, सतीश सरोदे, सखाराम सरोदे, गणेश सरोदे, सागर सरोदे,पंढरी खरबे, ज्ञानेश्वर खरबे, संतोष खरबे व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!